Swatantra Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (शनिवार) 139वी जयंती आहे. याच दिवसाचे निमित्त साधत निर्माते संदीप सिंग (Sandeep Singh) आणि आनंद पंडित (Anand Pandit), दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे. ऑगस्ट 2022पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.


‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे होणार आहे.


पाहा फर्स्ट लूक :




रणदीप हुडानं या चित्रपटामधील भूमिकेबद्दल एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, 'असे अनेक क्रांतिकारी आहेत, ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नावही त्यात अग्रक्रमी आहे. त्यांच्याविषयी बऱ्याच चर्चा होत असतात. त्यांच्याबद्दल लोकांना काही गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांची गोष्ट ही प्रेक्षकांच्या समोर मांडणे गरजेचे आहे.' रणदीपनं या चित्रपटाबद्दल एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. या ट्वीटला त्यानं कॅप्शन दिलं की, 'काही गोष्टी या सांगितल्या जातात, तर काही जगल्या जातात.'


'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भूमिकेसाठी रणदीप किती मेहनत घेत आहे, याची झलक चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याने भूमिकेसाठी वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे.


रणदीपचा दुसरा बायोपिक


बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा याचा हा दुसरा बायोपिक असणार आहे. याआधी त्याने ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. रणदीप हुडा आणि चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी यापूर्वी 'सरबजीत' चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटाची निर्मीती संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी केली असून, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. 


दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात, "लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटातील सावरकरांच्या व्यक्तिरेखेपेक्षा काही फरक पडणार नाही.  सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही.


हेही वाचा :