Ram Setu : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते. पण आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' हा सिनेमे फ्लॉप झाला होता. त्यामुळे आता 'राम सेतु'चा निर्माता विक्रम मल्होत्राने 'राम सेतु'वर लक्ष केंद्रीत केले आहे. 'राम सेतु' या सिनेमात जॅकलीन फर्नांडीज आणि नुसरत भरुचादेखील आहे. 'राम सेतु' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक शर्माने सांभाळली आहे. हा सिनेमा 24 ऑक्टोबरला दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'राम सेतु'चे निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी ट्वीट करत लिहिले आहे, 'राम सेतु' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षयचे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. मार्चमध्ये बच्चन पांडे हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने 49 कोटींची कमाई केली होती. तर 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाने 66 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे मागे पडले होते.
अक्षयकडे सिनेमांची रांग!
राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रक्षाबंधन', आणि 'मिशन सिंड्रेला' हे अक्षयचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. कोरोनामुळे या सिनेमांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत.
संबंधित बातम्या