Aila Bhatt Video : पाकिस्तानाच्या कराची येथील एका रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) व्हिडीओ क्लिपचा वापर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा खोडसाळपण करण्यात आला आहे. कराचीतील एका रेस्टॉरंटने आपल्या जाहिरातीत आलिया भट्टची व्हिडीओ क्लिप वापरत पुरुष ग्राहकांना पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू झाला आहे. मात्र, इतकी टीका झाल्यानंतरही पाकिस्तानी रेस्टॉरंटने ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून हटवलेली नाही.


पाकिस्तानी हॉटेलने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता वादाला सुरुवात झाली आहे. इतकेच नाही, तर या जाहिरातीसोबतच रेस्टॉरंटने पुरुषांसाठी 25% सवलत जाहीर केली आहे. रेस्टॉरंट स्विंगने हे पोस्टर ‘आजा ना राजा’, अशा कॅप्शनसह शेअर केले आहे. कराची, पाकिस्तानमधील एका स्विंग नावाच्या रेस्टॉरंटने बॉलिवूड चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' मधील एक सीन पुरुष ग्राहकांना नवी ऑफर देण्यासाठी वापरला आहे. रेस्टॉरंटने ही जाहिरात त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यावर आता जोरदार टीका होत आहे.


पाहा जाहिरात :



हॉटेलच्या जाहिरातीत वापरला गेलेला हा सीन 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील आहे, ज्यामध्ये आलियाने वेश्येची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक असा सीन आहे, जिथे ‘गंगूबाई’ बनलेली आलिया भट्ट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे हातवारे आणि हावभाव करत आहे. याच सीनचा वापर कराचीतील या रेस्टॉरंटमध्ये देण्यात येणाऱ्या ऑफरच्या प्रचारासाठी करण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियातून त्यावर जोरदार टीका केली जात आहे.


रेस्टॉरंटवर टीकेची झोड


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर येताच अनेक युजर्सनी त्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. आपण कशाचा वापर नेमका कशासाठी करतो, याचा विचार व्हावा, असे अनेकांनी म्हटले आहे. त्याच वेळी, आणखी काही इंस्टाग्राम युजर्सनी आपली प्रतिक्रिया देताना लिहिले की, 'जर तुम्हाला वाटत असेल की, ही एक प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि ती लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेईल, ग्राहकांना आकर्षित करेल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात!नही अशी क्लिप वापरून तुम्ही किती खालच्या पातळीवर उतरले आहात, हे लोकांना समजले आहे.’


हेही वाचा :