Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. अशातच अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर ख्रिसमसचा केक कट करताना 'जय माता दी'चा जयघोष करताना दिसत आहे.


रणबीर कपूरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर आणि आलियाने आपली लेक राहाचा चेहरा रिवील केला आहे. रणबीर आणि आलियाच्या लेकीचा पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आता चेकीची पहिली झलक त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राहाच्या गोंडसपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान एका कृतीमुळे रणबीरला मात्र ट्रोल करण्यात येत आहे.


कपूर कुटुंबात काही दिवसांपूर्वी क्रिसमस लंचचं आयोजन करण्यात आलं होतं. या विशेष कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. त्यांचा क्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर केकवर वाइन टाकताना दिसत आहे. हा केक कापताना रणबीर 'जय माता दी'च्या घोषणा देताना दिसत आहे. रणबीरसह या व्हिडीओमध्ये कुणाल कपूर, नव्या नवेली नंदा, आदर जैन आणि जहान दिसून येत आहेत.


रणबीर कपूर सोशल मीडियावर ट्रोल


रणबीर कपूरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्याने दिलेल्या 'जय माता दी'च्या घोषणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या नाहीत. दारू आणि जय माता दी'च्या घोषणा देणं योग्य नाही, सुपरस्टार बोलून आपणच त्यांचे लाड करतो, नशेत जय माता दीच्या घोषणा देणं योग्य नाही, चांगल्या कामासाठी देवीचं नाव घ्यायला हवं, असं म्हणत नेटकऱ्यांनी रणबीरला चांगलच ट्रोल केलं आहे.






बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचा मुलगा आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'सॉवरीया' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिल्या सिनेमातील अभिनयासाठी त्याचं प्रचंड कौतुक झालं. 


संबंधित बातम्या


VIDEO: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर म्हणाला, "जय माता दी"; नेटकरी भडकले