मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) फिल्म इंडस्ट्रीमधील चर्चित कपल्सपैकी एक आहे. आलिया-रणवीरची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. या क्यूट कपलला 2022 मध्ये गोंडस मुलगी झाली. राहा कपूरच्या (Raha Kapoor) जन्मानंतर आई आलिया भट आणि वडील रणवीर कपूर यांच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचं रणवीरने सांगितलं आहे. रणवीर कपूरने अलिकडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.
आलियाला जमलं नाही ते राहानं करुन दाखवलं
अभिनेता रणवीर कपूर याने निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, राहाच्या नंतर आलिया आणि त्याचं आयुष्य फार बदललं आहे. वडील झाल्यानंतरच्या आयुष्याबाबत बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, 'आता मी वडील झालो आहे आणि मला एक मुलगी आहे. यामुळे माझं आयुष्य खूप बदललं आहे. बाप झाल्यानंतर मला जणू माझा पुर्नजन्म झाला आहे. मला वाटतं की, माझ्या आयुष्यातील 40 वर्षे मी वेगळं जीवन जगत होतो आणि माझ्या मुलीच्या जन्मानं मला एक नवीन जीवन मिळालं आहे.
'मुलीच्या जन्माआधी मरणाचीही भीती नव्हती'
रणबीर कपूर पुढे म्हणाला की, राहाच्या जन्मानंतर त्याचा जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.रणबीर कपूर म्हणाला की, राहाच्या जन्माच्या आधी मला मरणाचीही भीती वाटत नव्हती, पण तिच्या जन्मानंतर मला मरणाची भीती वाटते. आपण वयाच्या 71 व्या वर्षापर्यंत जगू असं त्याला नेहमी वाटायचं, पण आता त्याला वाटतं की, 71 वर्ष खूप कमी आहेत.
राहासाठी रणबीरनं सोडलं व्यसन
मुलगी राहासाठी रणबीर कपूरने वाईट सवय सोडल्याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, 'मी वयाच्या सतराव्या वर्षापासून सिगारेट ओढत होतो. मला सिगारेटचं खूप व्यसन होतं, पण जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला, मी वडील झाल्यानंतर मी सिगारेट सोडली आणि मला पूर्वीपेक्षा खूपच फिट वाटत आहे.' वडील म्हणून नवीन जबाबदारीची जाणीव झाल्याने त्याला धूम्रपान सोडण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं त्यानं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :