Ranbir Kapoor Intense Workout For Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'रामायण' (Ramayana) हा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. रणबीर कपूरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. धनुर्विद्या प्रशिक्षकासोबतचा अभिनेत्याचा एक फोटो समोर आला होता. आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. रणबीरचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर रात्रंदिवस घाम गाळताना दिसून येत आहे. त्याचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून चाहते आग लावणार असं म्हणत आहेत. 


श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर घेतोय मेहनत


रणबीर कपूर 40 वर्षांचा आहे. पण 'रामायण' चित्रपटासाठी स्वत:ला फिट ठेवण्याचा तो प्रयत्न करत आहे. रणबीरच्या फिटनेस कोचने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर व्यायाम करताना दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये रणबीर रनिंग, लिफ्टिंगपासून ते स्विमिंग करताना दिसून येत आहे. तसेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रणबीर डोंगरावर चढताना दिसून येत आहे. बॅक जंप ते सायकलिंगपर्यंत अनेक गोष्टी अभिनेता करत आहे. एका व्हिडीओमध्ये रणबीरची गोंडस लेक राहादेखील दिसून येत आहे. अभिनेत्याच्या फिटनेस ट्रेनिंगचा भाग आलिया आणि राहादेखील झाल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. रणबीरचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते आनंदी असून रामाच्या भूमिकेत रणबीरला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर काही नेटकरी मात्र रणबीरला ट्रोल करताना दिसून येत आहेत.






रणबीरचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल


नितेश तिवारी यांनी 'रामायण' चित्रपटासाठी भव्य सेट तयार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'च्या सेटवर 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सेटची एक झलक समोर आली होती. सेटवरील व्हायरल व्हिडीओमध्ये मोठ-मोठे पिल्लर दिसून येत होते. 


रणबीर कपूरसह सनी देओल, बॉबी देओल, दाक्षिणात्य सुपरस्टार यश, विजय सेतुपतीसह अनेक मोठ-मोठे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अनेक टीव्ही कलाकारांचीदेखील या मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता या चित्रपटात नक्की कोण झळकणार हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. लारा दत्ता आणि रकुलप्रीत सिंहदेखील या चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.


'रामायण' चित्रपटासाठी रणबीरने किती मानधन घेतलंय? (Ranbir Kapoor Fees For Ramayana)


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने 'रामायण' चित्रपटातील श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी 75 कोटी रुपये चार्ज केले आहेत. याआधी 'अॅनिमल' चित्रपटासाठी रणबीरने 30-35 कोटी रुपये आकारले होते. तर दुसरीकडे साई पल्लवीने सीता मातेच्या भूमिकेसाठी फक्त 6 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 


'रामायण'च्या सेटवर नो फोन पॉलिसी लागू


'रामायण'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नितेश तिवारीने सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली आहे. तसेच शूटिंग संपेपर्यंत सेटवरील अतिरिक्त कर्मचारी आणि क्रू यांना सेटबाहेर जाता येणार नाही. 


संबंधित बातम्या


Ramayana : 'रामायण'च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल; पाहा अयोध्याची भव्य झलक, 11 कोटी केलेत खर्च