Rakul Preet Singh: अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) आणि अभिनेत्री  रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्या नात्याची घोषणा केली. अनेक वेळा जॅकी आणि रकुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडिया शेअर करत असतात. लवकरच हे दोघे लग्न करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता या चर्चेवर रकुल प्रीतनं मौन सोडलं आहे. 


एका ट्वीटमध्ये लिहीलं होतं की, रकुल आणि जॅकी  हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. या ट्वीटला रिप्लाय करत रकुल प्रीत सिंह एक ट्वीट शेअर केलं. यामध्ये तिनं लिहिलं, "@AmanPreetOffl तू हे कधी ठरवलं? मला सांगितलं पण नाही भावा. माझ्या आयुष्याबद्दल मला माहित नाही, हे किती मजेशीर आहे.' रकुलच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


Rakul Preet Singh: जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीनं सोडलं मौन


काही दिवसांपूर्वी रकुलचा वाढदिवस होता. या दिवशी जॅकीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये जॅकीनं लिहिलं, 'हॅप्पी बर्थ-डे माय लव, तू जगातील सर्वांत चांगली पार्टनर, मुलगी आणि मैत्रिण आहेस,  तू मला रोज प्रेरित करतेस.' जॅकीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं.






रकुलचे आगामी चित्रपट 


डॉक्टर जी आणि थँक गॉड हे रकुलचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डॉक्टर जी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. तर थँक गॉड हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


PHOTO: ‘ब्युटी आयकॉन’ रकुलचा खास लूक; दिलखेचक अदांवर फॅन्स झाले फिदा!