Rakhi Sawant Video Viral : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने नुकताच उमराह केला असून आता ती मुंबईत परतली आहे. भारतात परतल्यानंतर आता मला राखी नाही तर पापराझी म्हणायचं, असं ती पापराझींना म्हणाली. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून आता तिच्या एका नव्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
'फिल्मी ग्रान' या पेजवरील राखीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रामा क्वीन लाल रंगाच्या अबायामध्ये दिसत आहे. त्यावर तिने हारदेखील घातला आहे. तिचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. त्यावेळी पापाराझी तिचा फोटो काढण्यासाठी जातात. तेव्हा राखी भडकते आणि म्हणते,"कृपया दूर राहा...माझ्या जवळ येऊ नका. पुरुषांनी मला स्पर्श करू नका..मी मक्का-मदीनाला जाऊन आली आहे. त्यामुळे पुरुषांनी दूर राहावे. मला स्पर्श करू नये... मी पवित्र आहे".
राखी सावंत नेटकऱ्यांकडून ट्रोल
साखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर पवित्रचा अर्थ तुला माहिती आहे का? स्वत:ला उगाच पवित्र म्हणून घेत आहेस? फेमसाठी काहीही करते, एंटरटेनर, प्रत्येकवेळी नाटक करणं गरजेचं आहे का? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. नेटकऱ्यांनी राखीला चांगलच ट्रोल केलं आहे.
राखीने उमराह केल्यानंतर एका नेटकर्याने तिला प्रश्न विचारला होता की,"हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाफ धर्म स्वीकारलास? त्यावर उत्तर देत ती म्हणालेली,"हिंदू धर्मात कधीच काही चुकीचं किंवा वाईट नव्हतं. मी इस्लाम धर्म असणाऱ्या व्यक्तीसोबत निकाह केला. निकाह केल्यानंतर तुम्हाला इस्लाम धर्म कबूल करावा लागतो. आता मक्का-मदीनाला जायला मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे".
राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आदिल काही दिवसांपासून तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. राखीला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' असेही म्हटले जाते.
संबंधित बातम्या