Gautami Patil : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेली आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil) वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता गौतमीचे वडिलांची दखल घेतली असून माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असं ती म्हणाली आहे.
रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे (Dhule) शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली व मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर व त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला (Pune) घेऊन ये असे सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले व या ठिकाणी त्यांच्या मावशी व धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेली.
माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन : गौतमी पाटील
गौतमी पाटीलने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली की, "कालच मी माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात दाखल असल्याची बातमी पाहिली त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितले की वडिलांची तब्येत आता कशी आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये, वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेल व पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करेल तसेच धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी देखील गौतमी पाटीलच्या वडिलांची त्यांच्या वतीने जेवढी काळजी घेता येईल काळजी घेऊन एक मदतीचा हात दिल्याने गौतमी पाटील यांनी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांचे देखील आभार मानत आपली प्रतिक्रिया देखील गौतमी पाटीलने दिली.
नेमकं प्रकरण काय?
धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे मिळून आलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil Father) वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचं समोर आलं.
संबंधित बातम्या