Rakesh Roshan Birthday :  बॉलीवुड अभिनेते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांच्या अभिनयाचे आजही खूप चाहते आहेत. राकेश रोशन यांनी कर्करोासारख्या आजावर मात करत त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शनाचा प्रवास कायम ठेवला. राकेश रोशन यांनी 1970 मध्ये घर-घर की कहानी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. पण या सगळ्यात एक प्रश्न सगळ्यांना कायमच पडलेला असतो. ते म्हणजे राकेश रोशन यांचं टक्कल. 


खरंतर राकेश रोशन यांना टक्कल का पडलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण राकेश रोशनचे पहिले सिनेमे पाहिल्यानंतरचा त्यांचा लूक आणि आताचा लूक पाहता त्यांचे केस कुठे गेले असा सहज पडणारा प्रश्न आहे. राकेश रोशन यांना त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या दिग्दर्शनाने खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी 1987 साली खुदगर्ज या सिनेमातून दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली. 


'म्हणून राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस नाही'


पण राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस का नाही, याविषयी बरीच चर्चा केली जाते. त्याचं असं झालं की, राकेश रोशन यांनी त्यांचे केस दान करण्याचा निर्णय घेतला होता. खुदगर्ज या सिनेमाचा तो एक रंजक किस्सा आहे. त्यावेळी त्यांनी सिनेमा हिट झाल्यावर तिरुपती बालाजीला केस दान करण्याचा निर्णय घेतला होता.  त्याचवेळी त्यांचा खून भरी मांग या सिनेमाचंही शुटींग सुरु होतं. या सिनेमाच्या शुटींगवेळी ते त्यांच्या पत्नीसह तिरुपती बालाजीला गेले आणि त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या नवसाची आठवण केली. त्यावेळी राकेश रोशन यांनी टक्कल केलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर केस आलेच नाहीत. 


राकेश रोशन यांचा सिनेप्रवास


राकेश रोशन हे आखिर क्यों? या सिनेमातून अभिनेता म्हणून भेटीला आले होते. हा सिनेमा 1985 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता आणि 'दुष्मन ना करे दोस्त ने जो काम किया है' चित्रपटातील एक गाणे तेव्हापासून आजपर्यंत लोकांच्या ओठांवर आहे. राकेश रोशन यांचे वडील प्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार होते.  त्यांच्या वडिलांची ही गुणवत्ता त्यांचे भाऊ राजेश रोशन यांच्यापर्यंत पोहोचली आणि आज त्यांची इंडस्ट्रीत प्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळख आहे.


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : 'मलाही ते सगळं फेक वाटतंय, तिने पूर्ण त्याला गुंतवून टाकलंय'; निक्कीसोबतच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांची प्रतिक्रिया