Rajpal Yadav Father Passed Away : बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील एम्प रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजपाल यादवला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
प्रसिद्ध कॉमेडियनवर कोसळला दु:खाचा डोंगर
राजपाल यादव यांचे वडील वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांना दोन दिवसांपूर्वीच प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. 24 जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांचे निधन झाल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचं निधन
अभिनेता राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांचे निधन झालं आहे. ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी राजपाल यादव थायलंडमध्ये होते. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच 23 जानेवारी रोजी राजपाल यादव दिल्लीला पोहोचला. मात्र, शुक्रवारी अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
इंडस्ट्रीमधून एकामागून एक वाईट बातम्या समोर
गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला. त्यानंतर, 23 वर्षीय टीव्ही स्टार अमन जयस्वालचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातात अमनला जीव गमवावा लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
इतिहासात औरंगजेब आहे, पण भारतीय सेना नाही; अक्षय कुमार म्हणतोय, "बदलाची गरज..."