Sikandar Trailer Release Date : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान लवकरच त्याच्या नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खानच्या आगामी सिकंदर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सलमान खानचा सिकंदर चित्रपट 2025 मधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. सलमान खान यंदा ईदच्या मूहूर्तावर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित सिकंदर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना या चित्रपटाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची डेट लीक झाली आहे. भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान भाईजान चाहत्यांना सरप्राईज देणार आहे.


 'सिकंदर'च्या ट्रेलरची रिलीज डेट लीक


सलमान खानच्या सिंकदर चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनन त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आणखी वाढली आहे. सिकंदरच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर ट्रेलर सादर करण्यासाठी एक खास तारीख निवडली आहे. बहुप्रतिक्षित सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान 'भाईजान' देणार 'गूड न्यूज


सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान प्रदर्शित केला जाईल, असं निर्मात्यांनी ठरवले आहे. निर्मात्यांनी भारत-पाकिस्तान लीग सामन्याच्या दिवशी 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.


'सिकंदर'मध्ये काजल अग्रवालही महत्त्वाच्या भूमिकेत


यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ए.आर. मुरुगदास यांच्या खांद्यावर आहे. या चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिकंदर चित्रपटामध्ये सलमानचा नवा लूक पाहायला मिळणार आहे, त्याची पहिली झलकही समोर आली आहे.साजिद नाडियाडवालाच्या बॅनर ग्रँडसन एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


सलमान खान- रश्निका मंदानाची जोडी


बिग बॉस-18 संपल्यानंतर आता सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त झाला आहे. अलिकडेच तो मुंबईत त्याचे शूटिंग करताना दिसला. दरम्यान, सिकंदर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो. रश्मिका मंदाना सध्या विकी कौशलसोबत तिच्या छावा चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan Flopped Badly in Hollywood: सलमान खानच्या आयुष्यातली सुपरफ्लॉप फिल्म; हॉलिवूडची हिरोईन असूनही आपटला चित्रपट, 17 कोटींचं नुकसान, दिग्दर्शकानं इंडस्ट्री सोडली