Rajkummar Rao - Patralekha Wedding : अभिनेता राजकुमार राव  (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) हे आज विवाहबंधनात अडणार आहेत.  मागील दोन दिवसांपासून चंदीगडमध्ये लग्नसोहळा सुरु आहे. शनिवारी रात्री मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला होता. या खास सोहळ्याला कुटुंबासोबतच मोजक्याच मित्रमंडळी सहभागी झाले होते. पत्रलेखाची मैत्रीण अभिनेत्री हुमा कुऱेशीही चंदीगडमध्ये पोहचली आहे. आज, 14 नोव्हेंबर रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा चंदीगढमध्ये पारंपारिक पद्धतीनं विवाहबंधनात अडकणार आहेत. चंदीगडमधील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शनिवारी मेंहदी सोहळा पार पडला. या सोहळ्याआधी राजकुमार राव यानं पत्रलेखाला प्रपोजही केलं. या दोघांचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय. 


 






राजकुमार राव आणि  पत्रलेखा जाहिरातीदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्या दोघांना सिटी लाईट्स या चित्रपटात त्यांना कास्ट करण्यात आले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. याकाळात दोघांनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. मागील 10 वर्षांपासून दोघे एकमेंकाना डेट करत आहेत. सध्या राजकुमार रावकडे बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून पाहिलं जातं. सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 


राजकुमार आणि पत्रलेखा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर अभिनेता राजकुमार राव  आणि अभिनेत्री कृती सेनन चा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.