Gadar 2 Jailer OMG 2 Ghoomer Box Office Collection : सनी देओल (Sunnu Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) या प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हे सीक्वेलचे सिनेमे पाहायला प्रेक्षक पसंती देत आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहेत. क्रिकेटप्रेमी अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. 


बॉक्स ऑफिसवर सीक्वेलचा बोलबाला


'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची दणदणीत कमाई करत या सिनेमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 284.63 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या 11 दिवसांत या सिनेमाने (Gadar 2 Box Office Collection) 389.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 85.05 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने (OMG 2 Box Office Collection) 117.27 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. 'ओएमजी 2' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रिलीजच्या सुरुवातीला या सिनेमाने चांगली कामगिरी केली असली तरी नंतर मात्र हा सिनेमा थंडावला आहे.


रजनीकांत काही केल्या थांबेना....


रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता असते आणि त्याचे सिनेमे चाहते डोक्यावर घेतात. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 235.85 कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 288.60 कोटींची कमाई केली असून जगभरात या सिनेमाने 507.4 कोटींचा गल्ला जमवला आहे. रजनीकांत गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे. 


अभिषेक बच्चनचा 'घूमर' बॉक्स ऑफिसवर आपटला


अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस उतरला असला तरी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. भारतात या सिनेमाने फक्त 3.79 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 4.1 कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिषेक बच्चनचा 'घूमर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.


संबंधित बातम्या


Box Office Collection : सिनेमाच्या पडद्याला सोन्याचे दिवस; जाणून घ्या 'गदर 2', 'जेलर', 'OMG 2' आणि 'घूमर'च्या कमाईबद्दल...