Subhedar : 'सुभेदार' (Subhedar) हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 'वेड' (Ved) आणि 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमांना मागे टाकलं आहे. 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Continues below advertisement

'सुभेदार' सिनेमाने काय रेकॉर्ड केला आहे? 

'सुभेदार' या सिनेमाने रिलीजआधीच नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाला बुक माय शोवर 40 हजाराहून अधिक इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. मराठी मनोरंजनसृष्टीसाठी ही आनंदाची बाब आहे. 'सुभेदार' सिनेमाच्या टीमने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

'सुभेदार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सांभाळली आहे. शिवराज अष्टकातील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पाल लांजेकर यांचे 'फर्जंद' (Farzand), 'पावनखिंड' (Pawankhind), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हे चार सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता त्यांच्या आगामी 'सुभेदार' सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'सुभेदार' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजी मालुसरेंचा (Tanaji Malusare) कोंढाण्यावरील पराक्रम पाहायला मिळणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन प्रेक्षकांना या सिनेमातून होणार आहे. ‘सुभेदार’ सिनेमाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’  सिनेमात होणार आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला 'सुभेदार'

'सुभेदार' या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख,  अलका कुबल, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर  दैठणकर,  अर्णव पेंढारकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता तगडी स्टारकास्ट असलेल्या या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Subhedar : 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; चिन्मय मांडलेकर म्हणाला,"आम्ही शिवरायांचे मावळे अडचणींवर मात करणार"