Rajinikanth: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) यांची लखनौ येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रजनीकांत हे शुक्रवारी संध्याकाळी लखनौ विमानतळावर पोहोचले, जिथे त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या भेटीबद्दल विचारले, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, मी मुख्यमंत्र्यांसोबत  जेलर (Jailer) चित्रपट पाहणार आहे.


सुपरस्टार रजनीकांत हे तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. रजनीकांत हे  18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान यूपीमध्ये आहेत. सुपरस्टार रजनीकांत आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी  जेलर हा चित्रपट लखनौमधील एका थिएटरमध्ये पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, 'मला  'जेलर' चित्रपटाचा काही भाग पाहिला. माझ्या आधीच्या कमिटमेंट होत्या नाहीतर मी संपूर्ण चित्रपट पाहिला असता. मी सुपरस्टार रजनीकांतचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि या चित्रपटात जे काही पाहिले ते मला आवडले.'










नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. 'जेलर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी रजनीकांत यांनी उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराला भेट दिली.


जेलर चित्रपटाची स्टार कास्ट


'जेलर' या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच  मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे.या चित्रपटातील 'कावाला' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. तसेच  रथामारे,जुजुबी ही गाणी देखील या चित्रपटांमध्ये आहेत.  आता जेलर या चित्रपटानंतर सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jailer Movie Marathi Actor : रजनीकांतच्या 'जेलर'मध्ये झळकलेत दोन मराठमोळे चेहरे; एकाची तर थलायवासोबतच एन्ट्री