Rajinikanth Best Movies : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) चा आज वाढदिवस आहे. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा मानलं जातं. रजनीकांतने 1975 साली 'अपूर्वा रागनगाल' सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रजनीकांतला त्याच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे ओळखले जाते. आजदेखील रजनीकांत लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे 10 सर्वोत्कृष्ट सिनेमे चुकवू नयेत.
1. 'अपूर्वा रागनगाल' हा रजनीकांत यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ते कमल हासन, सुंदरराजन आणि श्रीदिव्यासोबत दिसून आले होते.
2. '16 वयाथिनीले' हा रजनीकांतचा दुसरा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. या सिनेमातदेखील रजनीकांत कमल हासनसोबत दिसून आले होते.
3.1978 साली प्रदर्शित झालेला 'मुल्लु मालारम' हा रजनीकांत यांचा तिसरा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी कालीची भूमिका साकारली होती. रजनीकांतचे सिनेमे नेहमीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात.
4. रजनीकांतचा 'थिल्लू मुल्लू' सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडच्या गोलमाल सिनेमाचा हा रीमेक होता. या सिनेमाने रजनीकांतला नवी ओळख मिळाली.
5. थालापथी सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने रजनीकांतला प्रचंड नावलौकिक मिळाले.
6. रजनीकांत यांचा 'अन्नामलाई' सिनेमा 1992 साली प्रदर्शित झाला होता.
7. 'बाषा' सिनेमा 1995 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रजनीकांत यांनी रिक्षाचालकाची भूमिका साकारली होती.
8. रजनीकांतचा 'पदायप्पा' सिनेमा 1999 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने रजनीकांत यांना सुपरस्टार ही नवी ओळख मिळाली.
9. एंथीरन सिनेमा 2010 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रजनीकांत आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.
10. रजनीकांतचा 'काला' सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रजनीकांत तामिळनाडूतून धारावी मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांचे गॉडफादर होते.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती
Majha Katta : दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर सूचलेला 'गोदावरी' सिनेमा, अभिनेता जितेंद्रसह दिग्दर्शक निखिलने जागवल्या आठवणी
अभिमानास्पद! सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha