Rajinikanth Highest Paid Actor In India : रजनीकांत (Rajinikanth) बस नाम ही काफी है... दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अभिनेत्याचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. 10 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने जगभरात 600 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने चांगलच मानधन घेतलं आहे. 


रजनीकांतच्या 'जेलर'ने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'जेलर' या सिनेमासाठी अभिनेत्याला 110 कोटी रुपये आधीच दिले होते. पण आता सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या मानधनात आणखी वाढ झाली आहे. रजनीकांतला 'जेलर' या सिनेमासाठी एकूण 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यामुळे रजनीकांत हा देशातील सर्वात महागडा अभिनेता झाला आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






नेल्सन दिलीपकुमार (Nelson Dilipkumar) यांनी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रजनीकांतच्या 'जेलर'ने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओहएमजी 2' (OMG 2) आणि सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमांना मागे टाकलं आहे. 'जेलर'ने भारतात आतापर्यंत 387 कोटींची कमाई केली आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच धमाका करत आहे.
 
'जेलर' या सिनेमात रजनीकांतसह तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, वसंत रवी आणि विनायकन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच या सिनेमात मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिव राजकुमार यांचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. रजनीकांतचे चाहते 'जेलर' हा सिनेमा पाहायला पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जात आहेत. तामिळ आणि तेलुगू सिनेप्रेमी हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. 


'जेलर' ओटीटीवर होणार रिलीज!


'जेलर' हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा 7 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा पाहू शकतात. हा सिनेमा फक्त हिंदीतच नव्हे तर तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. 


'जेलर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jailer Box Office Collection)


'जेलर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 276.7 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 73.6 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 34.7 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 387.1 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


संबंधित बातम्या


Rajinikanth : ज्या ठिकाणी कंडक्टर म्हणून काम केलं, त्या बस डेपोला रजनीकांतची भेट