Raj Thackeray : महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयुष्यात पहिलं रिल केलं आहे. रिल स्टार अथर्व सुदामेसोबत (Atharva Sudame) राज ठाकरे यांनी हे रिल केलं आहे. राज ठाकरे आणि अथर्व सुदामेचं रिल सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. यात राज ठाकरे म्हणत आहेत,"मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे.हिंदीत बोलण्याची आवश्यकता नाही". राज ठाकरे आणि अथर्व सुदामेचं रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रिल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं पहिलं रिल (Raj Thackeray First Reel)


रिलमध्ये सुरुवातीला अथर्व सुदामे म्हणत आहे,"1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची.. ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती यांनी खरंतर महाराष्ट्र घडवला. दरम्यान राज ठाकरे अथर्व सुदामेला थांबवतात आणि विचारतात,"काय अथर्व कधी आलास, काय चाललंय?". त्यावर अथर्व उत्तर देतो,"1 मे निमित्त जरा छोटंस भाषण आहे. ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय". अथर्वला थांबवत राज ठाकरे म्हणतात,"भाषण पाठ करतोय..बघू.. संयुक्त महाराष्ट्र, टिळक, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, पु.ल.देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर व्हा छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहेस". पुढे अथर्व त्यांना विचारतो,"साहेब यात काही बदल". 






राज ठाकरे म्हणतात,"बदल काही नाही.. उत्तम आहे हे...परंतु आपण आज काय करतोय ना तेदेखील सांगणं गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कतृत्व गाजवलं आहे आणि महाराष्ट्र मोठा केला आहे. आज आपण असं काय करणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. मला असं वाटतं त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे. समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावर आपण गरंगळत जाऊन हिंदी बोलतो. त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही". राज ठाकरे पुढे म्हणतात,"अभिमान आणि स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. चांगलं काम करतो आहेस. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत". राज ठाकरेंनी अथर्वला शुभेच्छा दिल्यानंतर बॅकग्राऊंडला 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं वाजतं. 


अथर्वच्या रिलवर कमेंट्सचा वर्षाव


अथर्वच्या रिलवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भावाने राजसाहेबांनादेखील रिलमध्ये आणलं, जिंकलस दोस्ता, जय महाराष्ट्र, दोन आवडते व्यक्तिमत्त्व एकत्र, बाळासाहेबांनंतर मराठी संस्कृती जपण्यासाठी झटणारे खंबीर नेतृत्व म्हणजे राज ठाकरे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Atharva Sudame: राज ठाकरेंच्या एका वाक्याचा इम्पॅक्ट अन् पुण्यातील भेट, रिल स्टार अथर्व सुदामेनं सांगितला स्पेशल किस्सा