Atharva Sudame: रिल स्टार आणि ओरिजनल कंटेन्ट अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा त्याच्या रिल्समुळे चर्चेत असतो. राज ठाकरे यांनी मनसेच्या रिलबाज पुरस्कार सोहळ्यात रिल स्टार अथर्व सुदामेचं कौतुक केलं होतं.  कार्यक्रमात भाषण सुरु असताना अथर्व सुदामेला पाहताच राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते, 'अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का!'. त्या कार्यक्रमानंतर अथर्वनं पुण्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या भेटीबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अथर्व सुदामेनं सांगितलं.


अथर्व  म्हणाला, "राज ठाकरेंच्या एका वाक्यामुळे माझे एक लाख फॉलोवर्स वाढले"


मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अथर्व म्हणाला, "मी दोन वेळा राज ठकरे यांना भेटलो. मनसेनं सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी एक अवॉर्ड फंक्शन ठेवलं होतं. त्यावेळी त्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे भाषण होतं. राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला मिळणार याबद्दल मला आनंद वाटत होता. राज ठाकरे हे भाषण सुरु असताना म्हणाले, अरे तू पण आलायस का? तेव्हा मी आधी मागे बघितलं की, ते दुसऱ्या कोणाला तरी बोलत आहेत का? त्यानंतर ते माझ्याकडे बघून म्हणाले, तूच. त्यानंतर मी उभा राहिलो.  राज ठाकरे म्हणाले, 'हा माझा अत्यंत आवडता आहे.' मग त्यांनी मला स्टेजवर बोलवलं. त्यांनी स्टेजवर पण माझ्यासारखी अॅक्शन केली. कार्यक्रम सुरु असताना बाहेर आल्यानंतर सगळे चॅनेल्सचे लोक तिथे होतो. त्यावेळी मी त्यांना मुलाखत दिला. राज ठाकरे यांनी कार्यक्रमात माझ्याबद्दल एकच वाक्य म्हणलं. पण त्या वाक्याचा इम्पॅक्ट खूप मोठा झाला. त्यानंतर मी त्या कार्यक्रमामधील राज ठाकरेंच्या वाक्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या व्हि़डीओला देखील खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर मला त्यांना पुन्हा भेटून थँक्यू म्हणायचं होतं. राज ठाकरेंच्या एका वाक्यामुळे दोन दिवसात माझे एक लाख फॉलोवर्स वाढले."






अथर्व सुदामे हा पुण्यात राज ठाकरे यांना दुसऱ्यांना भेटला. या दुसऱ्या भेटीचा किस्सा सांगताना अथर्व म्हणाला, "मला तेव्हा काळालं की, राज ठाकरे हे पुण्यात आले आहेत. तेव्हा मी काही लोकांना फोन करुन विचारलं की, ते पुण्यात आले आहेत का? तेव्हा त्यांनी मला त्यांच्या पुण्यातील घरी बोलवलं. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यांनी आम्हाला खूप विनोद सांगितले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे काही किस्से सांगितले, पु.ल. देशपांडे यांचे किस्से देखील त्यांनी सांगितले. आमची विविध विषयांवर चर्चा झाली. आम्हाला ते पाच मिनिट किंवा दहा मिनिट भेटतील, असं सांगण्यात आलं होतं पण त्यांनी दीड-पावणे दोन तास आमच्यासोबत गप्पा मारल्या. ते खूप मनमोकळेपणाने गप्पा मारत होते."


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Atharva Sudame: 'व्हॅलेंटाईन-डे' च्या व्हिडीओमुळे बदललं आयुष्य; विनोदी हावभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं, जाणून घ्या राज ठाकरेंचा आवडता रिल स्टार अथर्व सुदामेबद्दल...