Raj Kundra On Pornography Controversy : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या अनेक दिवसांपासून पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याला अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. आता अश्लील सिनेमांच्या निर्मितीमागे तो सहभागी होता का? यावर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. 


ट्विटरवरील एका सत्रात यूजरने राज कुंद्राला विचारले,"भावा तुला अटक कशी झाली? यावर उत्तर देत राज म्हणाला,"हे लवकरच बाहेर येईल! भ्रष्टाचार, सूड, निषेध आणि बरचं काही.. मी माझ्या आयुष्यात कधीही पोर्नोग्राफीमध्ये अडकलो नाही". यादरम्यान राज कुंद्राने शिल्पा शेट्टी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 






काय आहे प्रकरण?


गेल्या वर्षी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने मुंबईच्या मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक केली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आलं.


4 नोव्हेंबरला होणार सुनावणी


पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसह अटक करण्यात आली होती. अलीकडेच राज कुंद्राने पॉर्नोग्राफी प्रकरणी किला कोर्टात डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता, त्यावर उत्तर देताना गुन्हे शाखेने कुंद्राच्या अर्जाला विरोध करत त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे असल्याचं सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.


संबंधित बातम्या


Raj Kundra : राज कुंद्राच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; म्हणाला, 'आर्थर रोड जेलमधून बाहेर येऊन आज एक वर्ष...'