Lucky Ali : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल (Uddhav Thackeray) आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी गायक लकी अलीची (Lucky Ali) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गायक लकी अली यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, आय लव्ह उद्धव, मी उद्धव ठाकरेंच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला". फुल स्टॉप असं म्हणतं लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अल्पावधीतच त्यांच्या पोस्टला पाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
लकी अली यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य केलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी मुंबई योग्य व्यक्तीच्या हाती गेल्याचं भाष्य केलं होतं. लकी अली यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकरी उद्धव ठाकरेंचं समर्थन करत आहेत. तर काही लकी अलींच्या मताला विरोध करत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या