Gulkanda Tales: एक गाव, हस्तर आणि पैशांचा मोह या गोष्टी दाखवणारी कलाकृती पाच वर्षांपूर्वी रिलीज झाली होती. या कलाकृतीचं नाव तुंबाड (Tumbbad) असं आहे. तुंबाड हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्ष झाली आहेत,तरी अजूनही अनेक लोक या चित्रपाटचं कौतुक करतात. काही फिल्म क्रिटिक्सनं या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीचं कौतुक केलं. जबरदस्त वीएफएक्स असलेल्या तुंबाड चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राही बर्वे (Rahi Barve)  यांनी केलं.  राही बर्वे यांच्या आगामी प्रोजोक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतेच राही बर्वे यांनी त्यांच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


राही बर्वे यांची  ‘गुलकंद टेल्स’  ही वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. राही बर्वे यांनी या वेब सीरिजच्या सेटवरील फोटो शेअर करुन कॅप्शन मध्ये लिहिलं, 'गुलकंदा. फिल्म सिटी, फिल्मिस्तान, पी३, लडाख, हिमाचल.' राही बर्वे यांच्या या आगामी वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






‘गुलकंद टेल्स’ या वेब सीरिजमध्ये राही बर्वे हे एक भूमिका देखील साकारणार आहे, असंही म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, पत्रलेखा आणि कुणाल खेमू हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील.






 राही बर्वेच्या तुंबाड या चित्रपटानं बॉकेस ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याच्या या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटात   सोहम शहा,ज्योती माळशे, धुंडिराज प्रभाकर, अनिता दाते या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता राही बर्वेच्या ‘गुलकंद टेल्स’ या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजच्या रिलीज डेटबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. या सीरिजचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं म्हटलं जात आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Anand Gandhi: 'काहीही साम्य नाही'; तुंबाड आणि कांताराची तुलना करणाऱ्यांवर भडकला दिग्दर्शक