R Madhavan: अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांसोबत कनेक्‍टेड असतात. काही नेटकरी सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल करतात तर काही त्यांचं कौतुक करतात. नुकतीच अभिनेता आर. माधवन (R Madhavan)  आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी  ‘एनबीए अबु दाबी गेम्‍स 2022’मध्ये हजेरी लावली. दोघांनी येथे एक सेल्फी काढला. हा सेल्फी आर. माधवननं सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर काहींनी त्याला ट्रोल केलं. ट्रोलर्सला नुकतच आर माधवननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement

आर.माधवनचं ट्वीट आर. माधवननं ट्विटरवर रणवीर सिंहसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'लव यू माई ब्रो...' फोटो शेअर करुन आर माधवननं रणबीरला टॅग देखील केलं. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आर. माधवनला ट्रोल केलं. एका नेटकऱ्याला आर. माधवननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

आर. माधवननं दिलं सडेतोड उत्तर 

Continues below advertisement

रणवीरसोबत फोटो शेअर केल्यानं आर. माधवनला एका नेटकऱ्यानं ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'तुला अनफॉलो करायची वेळ आली आहे.'

या नेटकऱ्याला आर. माधवननं उत्तर दिलं, 'गरज नाही भावा, मीच करतो तुला अनफॉलो' आर. माधवननं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचं लक्ष वेधलं. 

आर.माधवन आणि रणवीरचे चित्रपट

23 सप्टेंबर रोजी आर.माधवनचा धोका हा चित्रपट रिलीज झाला. तर त्याच्या  'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 26 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.  अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला.   रणवीरचा काही दिवसांपूर्वी जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला पण या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली. पण आता रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगमी चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला रणवीर सज्ज झाला आहे. या चित्रपटात रणवीरसोबतच आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या: 

Ranveer Singh, Deepika Padukone : रणवीर-दीपिकाच्या नात्यात बिनसलं? चर्चांवर उत्तर देताना रणवीर सिंह म्हणतोय...