Pushpa: The Rise : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) च्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. सिनेमाचा ट्रेलर 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 


पुष्पा: द राइज' सिनेमाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थरार नाट्य असलेला हा चित्रपट 17 डिसेंबर, 2021 ला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन या सिनेमात चंदन तस्करची भूमिका साकारणार आहे. रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, अजय गोश आणि इतर कलाकारांच्या या सिनेमात महत्तवाच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिनेमातील मुख्य पात्रांची झलक दिसून येते.





'रश्मिका'च्या पात्रावर आधारित गाणे
'श्रीवल्ली' गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे 'रश्मिका'च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. 2021 सालातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे. 


'या' दिवशी होणार 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा 'पुष्पा' सिनेमा 17 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा दुसरा भाग 2022 सालात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Mirzapur S2 : Konkona Sen Sharma ने आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2021 मध्ये मिळवला विजय


Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक


मिथाली राजची कारकीर्द उलगडणार; Taapsee Pannu च्या 'शाबास मिथू' सिनेमाची तारीख ठरली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha