Mirzapur S2 : 'मिर्झापूर' ही वेबसीरिज 2019 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली. त्याचा दुसरा भाग 2020 मध्ये प्रदर्शित झाला. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मिर्झापूर वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. कलाकारांच्या भूमिकेमुळे मिर्झापूर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अमृता सुभाष यांना एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2021 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. 


सिंगापूरमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात आशिया-पॅसिफिक प्रदेशातील विविध क्षेत्रातील लोकांचा गौरव करण्यात आला. पुनीत कृष्णा यांनी वेबसीरिजला मिळालेला पुरस्कार अभिनेता ब्रम्हस्वरूप मिश्रा यांना समर्पित केला. वेबसीरिजमध्ये ब्रम्हस्वरूप मिश्रा यांनी ललितची भूमिका साकारली होती. यासोबत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनीदेखील ब्रम्हस्वरूप मिश्रा यांना पुरस्कार समर्पित केला.






कलाकारांच्या भन्नाट भूमिका, शिव्या आणि हिंसा यांचा खुबीने वापर केल्याने मिर्झापूर ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, माफिया राज, सरकारी यंत्रणेचे अपयश आणि गँग वॉर या सर्व गोष्टी मिर्झापूरमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. 


मिर्झापूरचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 
मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीझनमधली पंकज त्रिपाठीची भैय्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मिर्झापूरचा तिसरा सीझनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


OTT Upcoming Web Series : Aarya 2 पासून Mirzapur 3 पर्यंत या वेबसीरिजची प्रेक्षक पाहत आहेत आतुरतेने वाट


Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक


मिथाली राजची कारकीर्द उलगडणार; Taapsee Pannu च्या 'शाबास मिथू' सिनेमाची तारीख ठरली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha