Allu Arjun Pushpa 2:  अभिनेता अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) चाहते देशभरातच नाही तर जगभरात आहेत. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राइज' (Pushpa 2) या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. आता त्याचा  'पुष्पा: द रूल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच अल्लू अर्जुननं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रूल' या चित्रपटाच्या सेटची झलक दाखवली.


अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाचा सेट दिसत आहे.  'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाचं शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  'पुष्पा: द रूल'  या चित्रपटाच्या सेटवर अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन म्हणतो, 'भारतातील चाहते इतर चाहत्यांपेक्षा वेगळे आहेत. ते तुम्हाला पाहावे लागेल. मी असं शब्दात सांगू शकत नाही.'


अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो  'पुष्पा: द रूल' च्या सेटवर एका सीनचं शूटिंग करताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन हा त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेक अप करताना देखील दिसत आहे.


पाहा व्हिडीओ:



'पुष्पा: द राइज' या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता.   आता या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'पुष्पा: द रूल' या चित्रपटाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन एका जंगलामध्ये जातो, असं दिसते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Allu Arjun Won Best Actor National Film Award: अल्लू अर्जुन ठरला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'; 'पुष्पा: द राइज' साठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, ब्लॉकबस्टर चित्रपटाची पडद्यामागील गोष्ट माहितीये?