Gashmeer Mahajani Compare Chhatrapati Sambhaji Maharaj : रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता इन्स्टाग्रामवर 'Ask Gash' या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दरम्यान एका चाहत्याने छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याशी अभिनेत्याची तुलना केली आहे. 


'Ask Gash' या सेशनच्या माध्यमातून गश्मीरच्या एका चाहत्याने थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्याची तुलना केली आहे. या सगळ्या प्रकरणात गश्मीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गश्मीरच्या चाहत्याने कमेंट केली आहे की,"सर, तुमच्या आयुष्यातील संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे". यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला,"खूप मोठी तुलना करत आहात...माझ्यात त्यांच्या नखाचीही सर नाही".



गश्मीर महाजनीला एका चाहत्याने प्रश्न विचारला आहे की,"गश्मीर या नावाचा अर्थ काय आहे? त्यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"हनुमानाचं नाव आहे". तुम्ही तुमच्या घरी बाप्पाची स्थापना करता का? यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला,"हो करतो..खूपच साधं, मंगलमय आणि घरगुती वातावरण असतं आमच्याकडे". 'धर्मवीर' सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला,"धर्मवीर' सिनेमाबद्दल दोन शब्दात बोलणं कठीण आहे. माझ्या मोठ्या भावाचा सिनेमा आहे आणि चांगला सिनेमा आहे". 


गश्मीर महाजनी आईला 'अम्मी' हाक का मारतो?


गश्मीर महाजनी त्याच्या आईला 'अम्मी' अशी हाक मारतो. याबद्दल चाहत्याने त्याला प्रश्न विचारला आहे की,"तुम्ही तुमच्या आईला अम्मी का म्हणता?". यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"माझे वडील त्यांच्या आईला अम्मी अशी हाक मारत असे. खूप लहान असताना हा शब्द ऐकला असून तेव्हापासून हे नाव तोंडात बसले आहे". 


अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती देत असतो. गश्मीर महाजनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं होतं,"पुन्हा एकदा तोच प्रवास...लवकरच". त्यामुळे आता अभिनेत्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


गश्मीर महाजनी अनेकदा इन्स्टाग्रामवर 'Ask Gash' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. आता रविवारीदेखील या सेशनअंतर्गत त्याने चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने त्याच्या कामातून ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा  एकदा तो काम करण्यासाठी सज्ज आहे.


संबंधित बातम्या


Gashmeer Mahajani: वडिलांच्या निधनानंतर केस कापण्याबद्दल चाहत्यानं विचारला प्रश्न; गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी जर टक्कल केले असते तर...'