अतुल तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली. यामध्ये आपण पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं सांगितलं. यामध्ये त्यांनी पोलिसांनी आपल्याकडून लाच घेतल्याचाही उल्लेख केला आहे. त्या पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.
अतुल तापकीर यांची फेसबुक पोस्ट :