मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) 2018 मध्ये अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केले. लग्नानंतर निकला सोशल मीडियावर 'नॅशनल जीजू' असा टॅग मिळाला आणि आज सर्वजण त्याला 'नॅशनल जीजू' म्हणतात. निक जोनास नुकताच अमेरिकन टॉक शो 'द टुनाइट शो' मध्ये सहभागी झाला होता. जिथे त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी तो प्रियंका चोप्राशी लग्न केल्यानंतर मिळालेल्या 'नॅशनल जीजू' या टॅगबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.


निक जोनासला 'नॅशनल जीजू'चा टॅग


बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा 2018 साली जोधपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नानंतर भारतातील लोकांनी या गायिकेला 'राष्ट्रीय जिजू' हा टॅग दिला. यानंतर निक जोनासला भारतातच नाही तर परदेशात होणाऱ्या कॉन्सर्टमध्येही 'नॅशनल जीजू' म्हणून संबोधलं जाऊ लागलं.


'नॅशनल जीजू' टॅगवर निक जोनासची पहिल्यांदाच प्रतिक्रिया


अलीकडेच निक जोनासने जिमी फॅलनच्या टॉक शो 'द टुनाइट शो'मध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये तो 'नॅशनल जीजू' टॅगबद्दल मोकळेपणाने बोलला. होस्ट जिमीने शोमध्ये निक जोनासला प्रश्न विचारला की, त्याला 'नॅशनल जीजू' का म्हणतात आणि त्याला याबद्दल काय वाटतं. 


'नॅशनल जीजू' टॅगवर निक काय म्हणाला?


यावर उत्तर देताना निक म्हणाला की, "जसे सर्वांना माहित आहे की, मी प्रियांका चोप्राशी लग्न केले आहे आणि आमच्या लग्नानंतर मला 'नॅशनल जीजू' म्हटलं जाऊ लागलं आणि हा हॅशटॅग देखील सुरू झाला." निक पुढे म्हणाला, "मी प्रियांकाशी लग्न केल्यानंतरच 'नॅशनल जीजू' झालो आणि जीजू या शब्दाचा अर्थ मोठ्या बहिणीचा नवरा आहे, म्हणून मी भारताचा मोठा भाऊ आहे."


निकसोबत लग्न केल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली होती. निक आणि प्रियंकाला एक गोंडस मुलगी असून तिचं नाव मालती मेरी जोनास आहे. निक जोनास आणि प्रियांका चोप्रा नुकतेच अनंत अंबानींच्या लग्नासाठी भारतात आले होते. या कपलने लग्नात खूप मजा केली, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. अंबानींच्या कार्यक्रमात निक देसी ट्रेडिशनल लूकमध्ये शेरवानी परिधान केलेला दिसला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan : जेव्हा सलमान खानने वाचवले चिमुरडीचे प्राण, भाईजाननं केलं बोन मॅरो दान, जाणून घ्या संपूर्ण कहाणी