मुंबई : ऑगस्ट महिन्यात चित्रपटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार आहे, त्यातच 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका पाहायला मिळणार आहे. 15 ऑगस्टला राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' रिलीज होणार आहे. 'स्त्री 2' चित्रपटासोबतच अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेद' या चित्रपटांचीही बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. राम पोथीनेनीचा 'डबल आय स्मार्ट' चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. म्हणजेच आता बॉक्स ऑफिसवर चार हिंदी चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे.
'स्त्री 2' या चित्रपटाची जोरदार चर्चा
'स्त्री 2' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा कपूरच्या आगामी 'स्त्री 2' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. स्त्री 2 हा चित्रपट 2018 च्या ब्लॉकबस्टर स्त्री चित्रपटाचा सीक्वल आहे. स्त्री 2 चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पहिलं गाणं 'आज की रात' रिलीज झालं असून या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
जॉन अब्राहमचा 'वेदा'
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी 'वेदा' चित्रपटाच्या रिलीजमुळे चर्चेत आहे. पठाणनंतर अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. जॉनचा आगामी चित्रपट 'वेदा' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. आता अखेर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.
अक्षय कुमारचा खेल खेल में
सरफिरानंतर अक्षय कुमार त्याचा आणखी एक चित्रपटासह रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. खेल खेल में 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपामध्ये फरदीन खान, तापसी पन्नू, वाणी कपूर, ॲमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल आणि आदित्य सील हे कलाकार दिसणार आहेत. 25 जुलै रोजी त्यांच्या 'खेल खेल में' चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
मिस्टर बच्चन
रवी तेजाच्या 'मिस्टर बच्चन' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट अजय देवगण स्टारर 'रेड'चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाची कथा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश शंकर यांनी केले आहे. 'मिस्टर बच्चन' 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :