Laal Singh Chaddha Release Date: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय? याची अनेकांना उस्तुकता लागली होती. अखेर आज आमिर खाननं सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. येत्या 14 एप्रिलला लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, केजीएफ 3 (KGF 3) आणि पुष्पा 2 (Pushpa 2) यांसारख्या चित्रपटामुळं लाल सिंह चड्ढाच्या प्रदर्शनाच्या तारिखेत बदल करण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु, दाक्षिणात्य चित्रपटांच्या या वादळासमोर 'लाल सिंग चड्ढा' झुकणार नसल्याचं आमिर खानच्या पोस्टमुळं स्पष्ट झालंय. 


आमीर खान प्रोडक्शननं 20 नोव्हेंबरला लाल सिंह चड्ढा चित्रपटाची तारीख जाहीर केली होती. येत्या 14 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं प्रोडक्शननं स्पष्ट केलं होतं. परंतु, मेगास्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' आणि सुपरस्टार यशच्या 'केजीएफ 3' चित्रपटाच्या तारिखेत बदल करण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. यासंदर्भात आमीर खाननं इन्स्टावर एक पोस्ट केलीय. ज्यात लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारिखेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचं सांगितलं गेलंय. यामुळं प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलीय, अशा वृत्तांवर अजिबात विश्वास ठेवू नका. दाक्षिणात्य चित्रपटांच्या या वादळासमोर 'लाल सिंग चड्ढा' झुकणार नसल्याचं आमिर खानच्या ताज्या वक्तव्यानं स्पष्ट झालंय.





 


लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे.  लाल सिंह चड्ढा हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट  यांच्या फॉरेस्ट गंप या हिट चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खान, किरण राव  आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha