Priyanka Chopra On To Kill a Tiger: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही तिच्या अनेक गोष्टींमुळे कायमच चर्चेत असते. नुकतच प्रियांकाने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केलीये. प्रियांका चोप्रा आता ऑस्कर नामांकित डॉक्युमेंट्री  'टू किल अ टायगर'चा ( On To Kill a Tiger) भाग झाली आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. 


तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. यावर प्रियांकाने म्हटलं आहे की, मला जाहीर करताना खूप अभिमान वाटतो की आता मी ऑस्कर नामांकित चित्रपट 'टू किल अ टायगर'चा देखील एक भाग आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. "जेव्हा मी हा चित्रपट 2022 मध्ये पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्याच्या मार्मिक कथेने मी मंत्रमुग्ध झाले. 


प्रियांकाने काय म्हटलं?


अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर म्हटलं की, मी आता कार्यकारी निर्माता म्हणून ऑस्कर नामांकित चित्रपट 'टू किल अ टायगर' च्या टीममध्ये सामील झाली आहे.ही आनंदाची बातमी शेअर करताना अभिनेत्रीने आपला आनंद व्यक्त केला आहे.






डॉक्युमेंट्रीला मिळाले हे पुरस्कार


10 सप्टेंबर 2022 रोजी ‘टू किल अ टायगर’ हा माहितीपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. 'टू किल अ टायगर' हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याला ऑस्करमध्ये 'सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. एवढेच नाही तर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि इथे या चित्रपटाला 'बेस्ट कॅनेडियन फीचर फिल्म'साठी ॲम्प्लिफाय व्हॉईस पुरस्कार मिळाला.


अशी हे डॉक्युमेंट्रीची गोष्ट


या चित्रपटात एका 13 वर्षांच्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आलीये.जिथे तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. वडील आपल्या 13 वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ही गोष्ट झारखंडमध्ये राहणाऱ्या एका लहान मुलीची आहे.


ही बातमी वाचा : 


Pune drugs Viral Video :कार्ट्या असले उद्योग करतात, हे संस्कार म्हणायचे का?; नशेत टुल्ल असणाऱ्या पोरींचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!