Ramesh Pardeshi Post On Pravin Tarde Birthday : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा आज वाढदिवस आहे. प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा खास मित्र रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) अर्थात पिट्या भाईने खास पोस्ट शेअर केली आहे. पिट्या भाईने प्रवीण तरडेंना ब्लॉकबस्टर, रेकॉर्डब्रेक आणि सुपरहिट शुभेच्छा दिल्या आहेत. 


रमेश परदेशीची पोस्ट काय आहे? (Ramesh Pardeshi Post)


रमेश परदेशीने प्रवीण तरडेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"आज तुझा वाढदिवस.. एकजण भेटला आणि म्हणाला काय मग काय देणार दोस्ताला गिफ्ट. मी म्हटलं मी काय देणार तो एवढं देतो, देत आला देत आहे, देतच राहील. आम्हाला नाव दिलं ओळख दिली. बांधकामाच्या टाकीत फिल्मवर चित्र बघत ते 1 रुपया 10 पैसे देऊन मॉर्निंग, मॅटीनी रेग्युलर असे शेकडो सिनेमे बघत बघत स्वतः च्या सिनेमापर्यंत 45 वर्षापेक्षा जास्त काळाचा आपला प्रवास. तुझ्या पाठीला पाठ लाऊन नाही आलो पण पाठीला येऊन चिकटलो". 


रमेशने लिहिलं आहे,"आपलं नातं एक अलग आणि अलौकिक असं वेगळच आहे. तू जर या दगडाला घडवला नसता तर हा सतत लोकांच्या डोक्यात पडत राहिला असता, माझ्या अहिंसक स्वभावामुळे प्रचंड हिंसा व्हायची त्यात लाखो वेळा तुला महात्मा होऊन मिटवाव्या लागायच्या, लागतात. माझ्यावर झालेले हल्ले (जीवघेणे) पण तूच परतवून लावायचा. दोस्ती, दोस्तांना, याराना ,दोस्त माझा मस्त, मेरा यार, यार दिलदार, दोस्ती दुष्मनी, असे अनेक चित्रपट आणि असंख्य दोस्तीवरची गाणी आपल्या साठीच लिहीलेली आहेत असं वाटतं".






रमेशने पुढे लिहिलं आहे,"तुझ्याकडची ही देण्याची वृत्ती अशीच कायम राहो, तू खूप मोठा आहेस तसाच रहा. बाकी मागे मी आहेच कायम, तुला प्रचंड प्रचंड निरोगी आयुष्य लाभो. मध्यावर आलो आहोत पुढेही असचं राहू देवाकडे एकच प्रार्थना आहे भाऊ पार पार जीर्ण होऊन का होईना पण जायचं सोबतच नाही तर आपण करणार काय एकटे एकटे.... तुला अख्खं 100 वर्षाचं निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून वाढदिवसाच्या अशाच आनंदी,हाऊसफुल्ल, ब्लॉकबस्टर, रेकॉर्ड ब्रेक, सुपरहीट, शुभेच्छा". 


प्रवीण तरडेंबद्दल जाणून घ्या... (Pravin Tarde Movies)


प्रवीण तरडे हा लोकप्रिय अभिनेता आहे. कोकणस्थ, देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे अशा अनेक सिनेमांचा प्रवीण तरडे भाग आहेत. आता प्रवीण तरडेंच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Dharmaveer 2 : साक्षात आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात तेव्हा; धर्मवीरांच्या रुपात प्रसाद ओकने केली अष्टमीची आरती