Animal movie: सध्या अॅनिमल (Animal) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सहा दिवसात या चित्रपटानं 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं (Bobby Deol) खलनायकाची भूमिका साकारली आहे.  अॅनिमल या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अॅक्शन सीन्सचं अनेकजण कौतुक करत आहेत. अशातच एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलनं अॅनिमल चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या आईनं दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितलं आहे.


काय म्हणाली बॉबी देओलची आई? (Prakash Kaur Response To Bobby Deol Performance In Animal)


प्रकाश कौर यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिल्यानंतर कशी रिअॅक्शन दिलं? याबाबत बॉबी देओलनं सांगितलं, "माझी आई चित्रपटातील माझ्या भूमिकेच्या मृत्यूचा सीन पाहू शकली नाही. ती म्हणाली, 'ऐसी फिल्म मत किया कर तू, मुझे नहीं देखा जाता (अशा चित्रपटात काम करु नको, मला पाहवत नाही). त्यानंतर मी तिला म्हणालो, हे बघ, मी तुझ्यासमोर उभा आहे, मी फक्त एक भूमिका  साकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तिला खूप आनंद झाला. तिला खूप लोकांचे फोन आले, तिच्या सर्व मैत्रिणींना मला भेटायचे आहे. आश्रम वेब सीरिज रिलीज झाली होती तेव्हाही असेच काहीसे घडले."






अॅनिमलचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Animal Box Office Collection)


अॅनिमल  या चित्रपटानं भारतात 300 कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटानं सहा दिवसात बॉक्स ऑफिसवर 312.96 कोटींचे कलेक्शन केलं आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे. अॅनिमल या चित्रपटाची सॅम बहादुर या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. सॅम बहादुर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या अॅनिमल या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना,  तृप्ती डिमरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच मराठमोळे अभिनेते  उपेंद्र लिमये यांनी देखील एका सीनमध्ये काम केलं आहे. प्रेक्षक त्यांच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट करत आहेत. 


संबंधित बातम्या:


Animal Box Office Collection: बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे; 'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, सहाव्या दिवशी केली एवढी कमाई