Pranitha Subhash Touches Husband Feet: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash) 17 जुलै रोजी भीमना अमावस्येला पूजा केली. या पूजेचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहेत. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत असून  ती पतीच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. या फोटोला प्रणिता सुभाषने दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


 प्रणिता सुभाषची पोस्ट


 प्रणिता सुभाषनं तिच्या भीमना अमावस्येच्या पूजेचा फोटो शेअर करुन कॅप्सनमध्ये लिहिलं,  'भीमना अमावस्येनिमित्त सकाळी पूजा केली. तुमच्यासाठी तो पितृसत्ताकतेचा शो ऑफ असू शकतो (मागील वर्षी मी जे मिम्स पाहिले त्यावरुन), पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. सनातन धर्मात प्रत्येक विधीच्या मागे एक कथा आहे आणि हिंदू विधी पितृसत्ताक आहेत असा युक्तिवाद करणे पूर्णपणे निराधार आहे. कारण यामध्ये देवींची समान पूजा केली जाते.'






गेल्या वर्षी जेव्हा प्रणितानं  तिच्या पूजाचा फोटो सोशल मीडियार शेअर केला होता तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं. याच कारणामुळे  प्रणितानं  ही पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रणिता सुभाषने 2021 मध्ये बिझनेसमन नितीन राजूशी लग्न केले. प्रणिता ही एका मुलीची आई आहे. प्रणितानं तिच्या मुलीचे नाव अर्ना ठेवले आहे.


प्रणिता सुभाषचे चित्रपट


दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रणिता ही सक्रिय आहे. तिने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. ती पहिल्यांदा 2021 मध्ये हंगामा 2 चित्रपटामध्ये दिसली होती.  हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आहे. यानंतर ती अजय देवगणच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात देखील तिनं काम केलं.  प्रणिता सुभाष ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. विविध विषयांवर आधारित पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 6.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.प्रणिता ही अनेकवेळा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.






इतर महत्वाच्या बातम्या:


Kartik Aryan Chandu Champion Shooting: कार्तिकचं डेडिकेशन! 102 डिग्री ताप असताना केलं अंडरवॉटर सीनचं शूटिंग