praniket khune,sandhya keshe : ओ शेठ (O Sheth) आणि लय गुणाची हाय या गाण्यांच्या सुपरहिट यशानंतर संध्या प्रनिकेत ही आगळी वेगळी जोडी घेऊन आली आहे बाप्पाचं एक गोड गाणं ज्या गाण्यात सोज्वळता आणि प्रत्येकाला थिरकायला लावणारी ऊर्जा असं सगळं आहे. तसेच गाण्याचे शब्द संध्या प्रणिकेतचे असून या गाण्याला संगीतबद्ध सुद्धा संध्या प्रनिकेत ने स्वतःच केलं आहे. आपल्याला त्यांच्या कम्पोजिशन बद्दल तर माहितीच आहे.
ओ शेठ ऐकलं तर माणूस नाचायला लागतो आणि लय गुणाची हाय ऐकलं की प्रेमाची गुलाबी थंडी मनावर रंगांची उधळण करून जाते. हा तर आता आपण नवीन गाण्यासंदर्भात बोलूया पहिल्यांदाच त्यांनी दोघांनी फेस्टिव्हल सॉंग करण्याचा विचार केला हे गाणं शब्द आणि चालीनं असं खुलल की त्यांनी हे गाणं आदर्श शिंदे यांच्या कडून गाऊन घेतलं. आता या गाण्यातून तुम्हाला ही संध्या प्रणिकेतची स्टार जोडी स्वतः दिसणार आहे. तर गाणं ऐकण्यासाठी आत्ताच सज्ज व्हा, आणि येत्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या जोडीचं हे गजानना तुझ्याविना गाणं नक्की आपल्या घरात आणि जवळच्या मंडळात वाजवा.
प्रणिकेत खुणेची पोस्ट:
संध्या- प्रणिकेत यांच्या ओ शेठ गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
ओ शेठ संगीतबद्ध केलं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे आणि नाशिकच्या संध्या केशे यांनी. तर गायलं उमेश गवळी यांनी. प्रणिकेत हा उस्मानाबादचा तर संध्या नाशिकची. दोघांनाही कलेची प्रचंड आवड. घरची परिस्थिती बेताची असताना आपलं कलाप्रेम त्यांनी टिकवलं आणि दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली आहे. या जोडीने तब्बल चार वर्षांपासून एकत्र काम करत जवळपास 50 गाणी लिहिली आहेत आणि संगीतबद्ध केली आहे. लॉकडाऊनच्या काळात ओ शेठ हे गाणं बनलं. या गाण्याची निर्मिती तीन ठिकाणी झाली. गाणं लिहिलं गेलं उस्मानाबाद आणि नाशिकमध्ये तर गायलं गेलं पुण्यात. त्यानंतरचे संपादनाचे संस्कार हे उस्मानाबादमध्ये झाले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- O Sheth : अखेर 'ओ शेठ' गाण्याच्या मालकी हक्काचा वाद संपुष्टात, मनसेनं घडवून आणला समेट
- Entertainment News Live Updates 28 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!