Sunil Shroff Passed Away : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील श्रॉफ (Sunil Shroff) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अभिनीत 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमात ते शेवटचे झळकले. सुनील श्रॉफ यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 


सुनील श्रॉफ यांची शेवटची पोस्ट काय? (Sunil Shroff Last Post)


सुनील श्रॉफ यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 17 ऑगस्ट 2023 रोजीची आहे. या पोस्टमध्ये ते उत्साहात ईद साजरी करताना दिसत आहेत. ईद मुबारक या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. सुनील श्रॉफ यांनी शर्मिला टागोर आणि राधिका मंदाना यांच्यासोबत जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 






सुनील श्रॉफ यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Sunil Shroff Movies)


सुनील श्रॉफ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'शिद्दत','द फायनल कॉल','कबाड द कॉइन','जूली','अभय' अशा अनेक सिनेमांत सुनील श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत होते. डॉक्टर आणि वडिलांची भूमिका त्यांनी अनेकदा साकारली आहे. खिलाडी कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा बहुचर्चित 'ओह माय गॉड 2' हा सिनेमा सुनील श्रॉफ यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. 


अभिनेते सुनील श्रॉफ यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलांनी फेसबुक पोस्ट शेअर करत दिली आहे. सुनील श्रॉफ यांचा फोटो शेअर करत त्यांच्या मुलांनी लिहिलं आहे,"सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे". या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत. अभिनेत्याचे निधन नक्की कोणत्या कारणाने झाले हे अद्याप समोर आलेलं नाही. सुनील श्रॉफ यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.



सुनील श्रॉफ सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह होते. अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि जाहिरातींमध्ये सुनील श्रॉफ यांनी काम केलं आहे. सुनील श्रॉफ यांच्याआधी अभिनेते रियो कपाडीया यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रियो आणि सुनील यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.


संबंधित बातम्या


Rio Kapadia Demise: चक दे इंडिया फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास