Singham 3 New Update Vilian : अजय देवगण (Ajay Devgn) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांपासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनेत्याचा 'सिंघम' (Singham) हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमाचा आगामी भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 


अजय देवगण अभिनीत 'सिंघम' सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे. 'सिंघम 3' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आणि अजयचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'सिंघम 3' (Singham 3) हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 




'सिंघम' आणि 'सिंघम 2' या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. 'सिंघम 3'ची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता दुप्पट वाढली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'सिंघम 3' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन कपूरने 'सिंघम 3'च्या तयारीला सुरुवात केली आहे. 


अल्लू अर्जुन आणि अजय देवगण आमने-सामने?


रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2014 मध्ये 'सिंघम 2' हा सिनेमा प्रदर्शित झाला. आता 'सिंघम 3' हा सिनेमा ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणचा 'सिंघम 3' आणि अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात अल्लू अर्जुन आणि अजय देवगण बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. तसेच प्रेक्षकांनाही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


अर्जुन कपूर हा नेहमीच वैयक्तिक आयुष्यमामुळे चर्चेत असतो. त्याचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत. तर काही सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. अल्लू अर्जुनचा 'कुत्ते' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 'सिंघम 3' या सिनेमात अर्जुन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच 'मेरी पत्नी का रीमेक' आणि 'कनेडा' हे अर्जुन कपूरचे आगामी सिनेमे आहेत. 


संबंधित बातम्या