The Kerala Storyद केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतात हिट ठरल्यानंतर हा चित्रपट परदेशातही रिलीज केला जात आहे.  काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी नुकतीच द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


प्रकाश राज यांची पोस्ट


प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'डियर सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी या काल्पनिक प्रपोगंडा फिल्मचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि वापर केल्याबाबत तुमचे  डिस्क्लेमर काय आहे?' प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये जस्ट आस्किंग  हा हॅशटॅग देखील वापरल आहे. 






प्रकाश राज यांच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी  हिटलर आणि नरेंद्र मोदी यांचा लोकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'इतिहासाची पुनरावृत्ती.. काटेरी तारांमागे भविष्य आहे.. सावधान..' प्रकाश राज यांच्या  या पोस्टनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. 


प्रकाश राज हे सोशल मीडियावर विविध विषयांवरील आधारित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर  353K एवढे फॉलोवर्स आहेत, तर ट्विटरवर त्यांना  2.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. प्रकाश राज यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी सिंघम या चित्रपटात साकरलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' बोगस सिनेमा; प्रकाश राजचं वक्तव्य,अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर