Prakash Raj On The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकतंच केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राज यांनी (Prakash Raj) या सिनेमावर भाष्य केलं आहे. 


प्रकाश राज काय म्हणाले? 


केरळ चित्रपट महोत्सवादरम्यान प्रकाश राज म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' हा एक बोगस सिनेमा आहे. पण या सिनेमाची निर्मिती कोणी केली आहे याची आम्हाला कल्पना आहे. अशा सिनेमाचं कौतुक होणं ही फार गंभीर बाब असून या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणत आहेत,"आमच्या सिनेमाला ऑस्कर का मिळत नाही?". या सिनेमाला भास्करदेखील मिळणार नाही. 


अनुपम खेर यांची प्रतिक्रिया...


प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत अनुपम खेर (Anupam Kher) म्हणाले, "लोक त्यांचं मत मांडत असतात. काहींना आयुष्यभर खोटं बोलावा लागतं. तर काही मंडळी मात्र कायम खरं बोलतात आणि मी या खरं बोलणाऱ्या लोकांपैकी एक आहे. खरं बोलून आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये माझी गणना होते. खोटं बोलून आयुष्य जगणं मला आवडत नाही". 


प्रकाशच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीनेदेखील (Vivek Agnihotri) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत, "द कश्मीर फाइल्स'नंतर अनेक लोक अस्वस्थ झाले आहेत. मला भास्कर कसा मिळेल? हा तुमचा आहे. तो कायम तुमचाच राहील". याआधी देखील प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमादरम्यान 'द कश्मीर फाल्स'वर भाष्य केलं होतं. 






'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 11 मार्च 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण तरीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 250 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


The Kashmir Files: 'द कश्मीर फाइल्स'ला 'नॉनसेन्स' म्हणाले प्रकाश राज; 'अर्बन नक्षल' म्हणत विवेक अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया