Me Vasantrao World Digital Premiere : 'मी वसंतराव' (Me Vasantrao) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलाच गल्ला जमवला. 95 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगभरातील 300 पेक्षा अधिक सिनेमांच्या यादीत 'मी वसंतराव' या मराठी सिनेमाचा समावेश झाला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर (World Digital Premiere) होणार आहे.
'मी वसंतराव'चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर कधी होणार? (Me Vasantrao World Digital Premiere Date)
सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'मी वसंतराव' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 21 मे 2023 पासून जिओ सिनेमावर (JioCinema) प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 'मी वसंतराव' या सिनेमाचे चाहते गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत असल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
आमची कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा आनंद : राहुल देशपांडे
'मी वसंतराव' या सिनेमाबद्दल बोलताना राहुल देशपांडे (Rahul Deshpande) म्हणाले की,"मी वसंतराव' हा सिनेमा एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) यांचीच कथा मी त्यांचा नातू, एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो. त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा सिनेमा अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आता या सिनेमाचा डिजिटल वर्ल्ड प्रीमियर होणार आहे त्यामुळे आमची ही कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा मला खूप आनंद होत आहे".
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य आणि सांगितिक प्रवास 'मी वसंतराव' या सिनेमात दाखवण्यात आला आहे. अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची गोष्ट 'मी वसंतराव' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. राहुल देशपांडे व्यतिरिक्त सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निपुण धर्माधिकाराने (Nipun Dharmadhikari) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या