Prajakta Gaikwad: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) ही वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. ती शिवपुत्र संभाजी या महानाट्यात महाराणी येसूबाई ही भूमिका साकारत आहे. या नाटकाचे औरंगाबाद येथे प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगासाठी प्राजक्ता गायकवाड ही गेले आठ दिवस औरंगाबादमध्ये आहे. नुकातच प्राजक्तानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे चाहते तिला जेवण खाऊ घालताना दिसत आहेत.
प्राजक्ता गायकवाडनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्राजक्ताची एक फॅन तिला जेवण खाऊ घालत आहे. या व्हिडीओला प्राजक्तानं कॅप्शन दिलं, 'गेले आठ दिवस छत्रपती संभाजी नगर मध्ये आहे. कुणी प्रेमाने चुलीवरच्या भाकरी करून आणल्या. तर कुणी थालीपीठं. शेतातल्या तुरीच्या शेंगा उकडून आणल्या. चॉकलेट्स पण दिल्या. इथला प्रसिद्ध असा पदार्थ भल्ला सुद्धा टेस्ट केला. छत्रपती संभाजी नगरकरांच्या या प्रेमासाठी शब्द सुद्धा अपुरे आहेत. खरंतर या प्रेमामुळेच पोट भरतं.'
प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 18 हजारपेक्षा जास्त युझर्सनं लाइक केलं आहे. तर 123 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
प्राजक्ता गायकवाडनं आई माझी काळुबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. प्राजक्ताच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा शेवटचा प्रयोग आज (28 डिसेंबर) औरंगाबादमधील बीड बायपास येथील जबिंदा ग्राऊंड येथे होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Prajakta Gaikwad : सदानंदाचा येळकोट! प्राजक्ता गायकवाडने जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार