Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी चित्रपटांबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यातून अमेय यांनी थिएटरमालकांना आवाहन देखील केलं आहे.
अमेय खोपकर यांचे ट्वीट
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेननेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानीच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता 30 डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही.'
'थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.' असं देखील अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं.
हा पाकिस्तानी चित्रपट होऊ शकतो भारतात प्रदर्शित
‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' मध्ये अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट आधी 23 डिसेंबर रोजी भारतात रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी भारतात रिलीज होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: