Prabhas : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार लोकप्रिय अभिनेता प्रभास (Prabhas) सध्या चर्चेत आहे. प्रभास अनेकदा व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. आता अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. 


प्रभासचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. त्यामुळे तो नक्की कोणासोबत लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'रामायण' सिनेमातील अभिनेत्याची सहकलाकार कृती सेननसोबत (Kriti Sanon) सुरुवातील प्रभासचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या (Anushka Shetty) फेक लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये AI ने प्रभास-अनुष्काचं लग्न लावलेलं दिसलं. प्रभास गेल्या काही दिवसांपासून सिंगल असून आता मिंगल होण्यासाठी तो सज्ज आहे.


प्रभासच्या काकीने दिली माहिती...


मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासची काकी म्हणाली,"दुर्गा देवीच्या आशीर्वाने प्रभासचं लग्न होईल. येत्या काही दिवसांत प्रभास लग्नबंधनात अडकणार आहे. प्रभासच्या लग्नाचं माध्यमातील सर्वांना आमंत्रण दिलं जाणार आहे. प्रभासने वेडिंग लोकेशनदेखील ठरवलं आहे". प्रभासची होणारी पत्नी नक्की कोण असेल यासंदर्भात त्याच्या काकीने मात्र काहीही सांगितलेलं नाही. 






'या' ठिकाणी प्रभास अडकणार लग्नबंधनात (Prabhas Wedding Location)


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रभास आणि कृती सेनन रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. प्रभास आणि कृतीचं लग्न व्हावं अशी चाहत्यांचीही इच्छ होती. एका कार्यक्रमादरम्यान प्रभास म्हणाला,"मी तिरुपतीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे". प्रभासने दिलेल्या या माहितीनंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता प्रभास कोणासोबत लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


प्रभासचा 'सालार' (Salaar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी'सोबत (Dunky) या सिनेमाची टक्कर होणार आहे. हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर 'सालार' हा सिनेमा 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमरान, श्रुती हासन आणि मीनाक्षी चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


संबंधित बातम्या


Prabhas-Anushka Shetty : AI ने लावलं प्रभास-अनुष्का शेट्टीचं लग्न; बाळासोबतचा फोटोही व्हायरल