Kundara Johny Death: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी (Kundara Johny) यांचे मंगळवारी (17 ऑक्टोबर) केरळमधील (Kerala) कोल्लम येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या 71 वर्षाी अखेरचा श्वास घेतला (Kundara Johny Passes Away). 1991 मध्ये रिलीज झालेल्या गॉडफादर (Godfather) या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं.


कुंद्रा जॉनी यांनी मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. FEFKA डायरेक्टर्स युनियनने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करुन कुंद्रा जॉनी यांना श्रद्धांजली वाहिली. 


पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा जॉनी यांच्या निधनानंतर केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "कुंद्रा जॉनी यांनी चार दशकांहून अधिक काळातील त्यांच्या कारकिर्दीत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे." कुंद्रा जॉनी यांच्या निधनानंतर  मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.














कुंद्रा जॉनी यांचे चित्रपट 


1979 मध्ये नित्या वसंतम (Nithya Vasantham) यांच्यासोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या कुंद्रा जॉनी यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. 'किरीदम' आणि 'चेनकोल' या ब्लॉकबस्ट चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. त्यांनी ‘वाझकाई चक्रम’ आणि ‘नदीगन’ या तमिळ चित्रपटही त्यांनी काम केलं.  मोहनलाल (Mohanlal) अभिनीत 'किरीदम' या चित्रपटात, कुंदारा जॉनी यांनी साकारलेल्या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली.


‘15 अगस्त’, ‘हॅलो’, ‘अवन चंडीयुडे माकन’, ‘भार्गवचरितम मुन्नम खंडम’, ‘बलराम बनाम थरादास’, ‘भारत चंद्रन आईपीएस’, ‘दादा साहेब’, ‘क्राइम फाइल’, ‘थचिलेदाथ चुंदन’, ‘सामंथरम’, ‘वर्नाप्पकिट’, ‘सागरम साक्षी’ आणि ‘अनावल मोथिराम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. कुंद्रा जॉनीचा शेवटचा चित्रपट 'मेप्पडियन' हा 2022 मध्ये प्रदर्शित झाला.


इतर महत्वाच्या बातम्या:


Bhairavi Vaidya: ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास