Deepika Padukone : अॅमेझॉन प्राइम व्हिडियोतर्फे (Amazon Prime) आज  'गहराईयां' (Gehraiyaan) या आगामी अॅमेझॉन ओरिजिनल मूव्हीचे 6 नवे पोस्टर्स प्रकाशित करण्यात आले आहेत. शकुन बत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात आधुनिक नात्यांमध्ये असलेली गुंतागुंत, प्रौढत्व, एखादी गोष्ट सोडून देणे आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरविणे या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) आज 36 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने दीपिकाने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


गहराईयां या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून दीपिकाने त्याला कॅप्शन दिले, 'माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या चाहत्यांना ही खास भेट.'









दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर हे या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अॅमेझॉन प्राइम व्हिडियोवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Gehraiyaan Teaser : Deepika Padukone आणि Siddhant Chaturvediचा किसिंग सीन व्हायरल, पाहा टीजर


Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण; मुलगा आणि पत्नीही पॉझिटिव्ह