Potra Film : वर्ल्ड फिल्म कार्निव्हल-सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये शंकर धोत्रे यांना पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. पोटरा या मराठी सिनेमासाठी हा पुरस्कार शंकर यांनी पटकावला आहे. 'पोटरा' सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती दाखवतो. सोलापूर जिल्ह्यात घडणाऱ्या कथानकात मुलींना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. 'पोटरा' म्हणजे ज्वारीचं कणीस, हे कणीस जपायचं असतं. शेतात कणीस डोलायला लागली की त्याची जास्त काळजी घ्यायची असते. हा नियम माणसालाही लागू पडतो. वयात येणाऱ्या मुलीलाही असंच जपायचं असतं हे सांगणारा हा सिनेमा ओपन एन्डेड आहे. ओपन एन्डेड म्हणजे पाहणाऱ्याने आपआपल्या पध्दतीनं या सिनेमाचा अर्थ लावायचा. अस्सल ग्रामीण भाषेतला सिनेमा आता वेगवेगळ्या आंतराराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होणार आहे.





वर्ल्ड फ़िल्म कार्निव्हल सिंगापूर हा जागतिक पातळीवर सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे. जगभरातल्या प्रेक्षकांसमोर आपली सर्वोत्तम कलाकृती सादर करण्याची ही महत्त्वाची संधी आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आला सिनेमा पाठवण्यात येऊ शकतो. तिथं चांगला प्रतिसाद मिळाल्यास सिनेमाला जागतिक बाजारपेठ मिळण्यास मदत होते. यात सहभागी होणाऱ्या फिल्म्सला गोल्डन मेरीऑन अवार्डसाठी नॉमिनेट होता येतं. जगभरातला सर्वोत्तम सिनेमा एका ठिकाणी आणून वेगवेगळ्या देशातली विविधता मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म अतिशय उपयुक्त ठरतो.


 


पोटरा हा शंकर धोत्रेंचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात त्यांनी अमॅच्युअर म्हणजेच या आधी कधीही सिनेमात काम न केलेल्या सर्वसामान्य गाववाल्यांना संधी दिलेय. मुख्य पात्रांचं तीन महिने वर्कशॉप घेण्यात आलं. तिथं त्यांची तयारी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातल्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी ऐन करोना काळात या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलं. 


पोटराची सिनॅमॅटीक मांडणी जागतिक दर्जाची आहे. भारतातली सामाजिक स्थिती, इथली कुटुंबव्यवस्था आणि स्त्री-पूरूष संबंध जगभरातल्या कुठल्याही भागात राहणाऱ्या प्रेक्षकांना सहज समजतील अशी सोपी मांडणी सिनेमाची करण्यात आली. त्यासाठी त्याच्या कलात्मकेवर जास्त भर देण्यात आला आहे. तसेच प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शंकर धोत्रे यांनी केला आहे.


संबंधित बातम्या


Shark Tank Judges Profile : एका अनोख्या कल्पनेसाठी देतायत कोटींची मदत, कोण आहेत ‘हे’ भारतीय ‘शार्क’?  


RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची अंतिम रिलीज डेट आली समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha