Amitabh Bachchan Niece Naina Bachchan : सध्या मनोरंजनसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. कलाकारमंडळी चाहत्यांसोबत त्यांचा आनंद शेअर करत आहेत. अशातच बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. अमिताभ यांच्या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला आहे. त्यांच्या जावयाने यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
सिने अभिनेता कुणाल कपूर आणि नयना बच्चनला मुलगा झाला आहे. कुणालने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कुणालने आतापर्यंत त्याच्या पत्नीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केलेला नाही. पण आता मुलगा झाल्यानंतर कुणालने चाहत्यांना थेट आनंदाची बातमी दिली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर कुणालने लिहिले आहे,"नैना आणि मी आता आई-बाबा झालो आहोत. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे. देवाचे आभार मानतो". कुणालची पत्नी नयना बच्चन ही बिग बींच्या भावाची मुलगी आहे. कुणालच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत त्याचे अभिनंदन करत आहेत.
संबंधित बातम्या
Shark Tank Judges Profile : एका अनोख्या कल्पनेसाठी देतायत कोटींची मदत, कोण आहेत ‘हे’ भारतीय ‘शार्क’?
RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची अंतिम रिलीज डेट आली समोर, 'या' तारखेला होणार प्रदर्शित
Ram Setu Wrap Up : अक्षय कुमारने दाखवली 'राम सेतू'ची झलक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha