Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) अखेर सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने जोडीदाराची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. अखेर 28 फेब्रुवारी 2024 रोजी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला आहे.
पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. अभिनेत्रीचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाने लग्नाने हिरवा चुडा, भरजरी दागिने आणि लाल रंगाची साडी नेसली होती. तर दुसरीकडे सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
पूजा झाली चव्हाण कुटुंबाची सून (Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding Photo)
पूजा आणि सिद्धेशवर सध्या चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पूजा-सिद्धेशच्या क्रिकेटची मॅच साखरपुडा, मेहंदी आणि हळदी समारंभाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रत्येक कार्यक्रमासाठी तिने खास लूक केला होता. आता पारंपारिक पद्धतीत लग्न करत पूजाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजा अखेर आता चव्हाण कुटुंबाची सून झाली आहे. पूजा सावंतने नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर पूजा कधी लग्न करतेय याकडे चाहत्यांचं लक्ष होतं.
पूजा-सिद्धेशच्या लग्नात सेलिब्रिटींची हजेरी
पूजा-सावंतच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. सध्या कलाविश्वासह चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पूजा-सिद्धेशच्या लग्नात अभिजीत व सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अभिनय आणि नृत्यासह आपल्या सौंदर्याने पूजाने सर्वांना वेड लावलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या